नाशिक( प्रतिनिधी) : सोमवारी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीची घोषणा केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बाजारात कांदा क्विंटल मागे दारात ५०० ते ८०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील कांदा उत्पादक संतप्त झाले आहेत.
सकाळपासूनच जिल्हाभरातील अनेक बाजार समिती मधील लिलाव प्रक्रिया कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून बंद पाडण्यात आल्या. जिल्हाभरात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कांद्यावरील निर्यात बंदी मागे न घेतल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आणि संतप्त वातावरणाची केंद्र सरकारने दखल घेऊन बंदरामधील आणि सीमेवरील रोखलेल्या कांद्याची माहिती घेण्यात आली.