नियुक्तीपत्रके मिळून सुद्धा गैरहजर असलेल्यांवर गुन्हे दाखल करा : महापालिका आयुक्त

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे बघता महापालिका प्रशासनाने वैद्यकीय विभागात मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक अशा अनेक पदांसाठी जागा उपलब्ध होती. त्यानंतर मुलाखत प्रक्रिया राबवण्यात आली आणि विविध पदांमध्ये पात्रता असलेल्यांना मानधन स्वरूपावर रुजू करण्यात आले. परंतु नियुक्ती होऊन सुद्धा काही स्टाफ गैरहजर असतात. आणि ज्यांना नियुक्तीपात्रके दिली आहेत ते रुजू होण्यास नकार देत आहेत. सध्या महापालिका प्रशासनाला वैद्यकीय विभागात स्टाफ ची गरज असल्याने जे असा प्रकार करताय त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सूचना महापालिकेचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी केली.