नाशिक शहरात कोरोना रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवली; हे नंबर्स सेव्ह करून ठेवा

नाशिक (प्रतिनिधी): खाजगी रूग्णालयामधील बिला संबधी लेखापरिक्षण विभागा मार्फत कोविड रूग्णांलयांसोबतच नॉन कोविड रूग्णालयातील इतर सर्व रूग्णांच्या बिलांची पुर्व छाननी करणेत येत आहे. सध्या शहरातील मनपा रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्यात आलेली आहे. तसेच एकूण 14 खाजगी  रुग्णालयातील शंभर टक्के बेड (एकुण 630 बेड) कोविड साठी आरक्षित करण्यात आले आहेत व 25 खाजगी रुग्णालयातील बेड (एकुण 511 बेड) अंशत: कोविडसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.

सदर रुग्णालयातील  बेड रुग्णांना उपलब्ध करून  देण्यासाठी  नाशिक महानगरपालिकेतर्फे मध्यवर्ती बेडचे नियोजन करण्यासाठी [Centralised Bed Reservation System (CBRS)] ही संगणक प्रणाली तयार करण्यात आलेली आहे. सदर संगणक प्रणालीद्वारे रुग्णालयात भरती झालेले रुग्ण व रिक्त बेड संख्या यांची अचूक माहिती प्राप्त होणार आहे व त्यानुसार बेड चे नियोजन करण्यात येणार आहे. कोरोना बाधित रुग्णांना हॉस्पिटलची गरज असल्यास नाशिक महानगरपालिकेच्या हेल्पलाइन क्रमांक 9607623366 या क्रमांकावर फोन केल्यास, रूग्णांच्या लक्षणांनुसार त्यांना रुग्णालय व रुग्णालयातील बेड क्रमांक निर्धारित करण्यात येईल.सदर हेल्पलाईन 24 x 7 सुरु राहणार आहे. संबंधित रुग्णालयात रुग्ण भरती झाल्याबरोबर सदर संगणक प्रणालीमध्ये रुग्णाची संपूर्ण माहिती तात्काळ भरली जाईल.

आरक्षित केलेल्या खाटा संख्येनुसार व भरती रुग्ण संख्येनुसार एखाद्या रुग्णालयातील रिक्त बेड ची संख्या मनपा मुख्यालयात स्थापन केलेल्या हेल्पलाइन कक्षास त्याच क्षणी प्राप्त होणार असून त्यानुसार रुग्णास संदर्भित करणे सोयीचे होणार आहे. यासाठी हेल्पलाइन कक्षाला रुग्ण कोणत्या रुग्णालयात संदर्भित करावा याचे नियोजन करता येणार आहे. याप्रमाणे संगणक प्रणाली तयार झालेली असून सदर हेल्पलाइन दि. 30/07/2020 पासून कार्यान्वित होईल. मनपाने कोविडसाठी पूर्णपणे आरक्षित केलेले खाजगी रुग्णालय,अंशत: आरक्षित खाजगी रुग्णालय व मनपा रुग्णालय  यांची यादी व रूग्णालय निहाय बेडची संख्या  या बाबतची माहिती नाशिक महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nashikcorporation.gov.in वर  उपलब्ध  आहे.

कोरोना विषयक विविध बाबीसाठी हेल्पलाइन क्रमांक:
खाजगी हॉस्पिटल मध्ये बेड आरक्षित करणेसाठी
– 9607623366
कोरोना विषयक माहितीसाठी – 9607432233 व 0253-2317292
खाजगी हॉस्पिटलचे बिला संदर्भात तक्रारीसाठी – 9607601133