नाशिक महानगरपालिका उभारणार ऑक्सिजन निर्मिती प्लांट….

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात कोरोना बाधितांची  संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरातील शासकीय निमशासकीय  रुग्णालयात गंभीर कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजन महत्वाचे असल्याने ऑक्सिजनचा मोठा प्रश्न निर्माण झांला आहे. रुग्णालयत रुग्णांना ऑक्सिजन मिळणेसुद्धा आता कठीण झाले आहे. त्या मुळे नाशिक महानगरपालिकेने ऑक्सिजन प्लांट उभारणीचा निर्णय घेतला आहे.

स्थानिक पुरवठादार रोजच्या रोज महापालिकेच्या रुग्णलयात शंभर ते सव्वाशे ऑक्सिजन सिलेंडर देताहेत तरीसुद्धा ऑक्सिजनची कमी  भासतेय. नाशिकसह इतरही भागातील ऑक्सिजनची मागणी असल्याने त्या उत्पादकांवर देखील मर्यादा आल्या आहेत. महापालिकेने पुरवठादारांकडून शंबर टन ऑक्सिजनचा कोठा वाढवला असला तरी रुग्णालयांची गैर सोय झाली आहे. त्यामुळे शहरात ऑक्सिजनची कमी भरून काढण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागरगोजे यांना नवीन बिटको रुग्णालयाजवळ ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यासाठी सूचना दिल्या  आहेत.