नाशिक: बोगस जात प्रमाणपत्र जोडून झाला डॉक्टर..

नाशिक: बोगस जात प्रमाणपत्र जोडून झाला डॉक्टर..

नाशिक (प्रतिनिधी): अनुसूचित जाती-जमातीच्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एमबीबीएसला प्रवेश घेत पदवी संपादन करणाऱ्या एका डॉक्टरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. ईसलाहुझामा सलाउद्दील अन्सारी (२८, रा. भायखळा) असे या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर कोयताधाऱ्यांचा धिंगाणा

पोलिसांनी दिलेली माहिती आणि आग्रीपाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन २०१० ते २०११ या कालावधीत संशयित डॉ. अन्सारी यांनी अनुसूचित जाती जमातीचे नसताना आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजला ‘तडवी’ या अनुसूचित जमातीचे खोटे जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करत अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षित जागेवर एमबीबीएससाठी प्रवेश मिळवत डॉक्टरची पदवी प्राप्त केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारीची दखल घेत संशयित डॉक्टरच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून सोमेश्‍वर धबधब्यात पडल्याने युवतीचा मृत्यू