नाशिक: बस व दुचाकीच्या अपघातात सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

नाशिक: बस व दुचाकीच्या अपघातात सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील मखमलाबाद रोडवरील क्रांतीनगर येथे एसटी बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला.

दिलीप विक्रमसिंग वळवी (58, रा. अनुसया नगर, कांदा बटाटा मार्केटच्या पाठीमागे, मखमलाबाद शिवार) असे मृताचे नाव आहे.

गुरुवारी दुपारी 1 वाजता दिलीप वळवी हे क्रांतीनगर येथील पीर बाबा दर्ग्याजवळून दुचाकीवरुन प्रवास करत होते.

त्याचवेळी एसटी बस दुचाकीचा अपघात झाला.

त्यात वळवी यांच्या डोक्याला व तोंडाला जबर मार लागला. त्या नंतर येथील सागर तुपे यांनी गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉ. पगार यांनी तपासून मृत घोषित केले. या अपघाताचा पुढील तपास पंचवटी पोलिस करत असून मृत वळवी हे तीन महिन्यांपूर्वीच पोलिस खात्यातून निवृत्त झाले होते. त्यांच्या या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटूंबियांसहीत त्यांच्या पूर्व सहकारी- कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
अबब.. नाशिक जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणाहून तब्बल पाऊणे पाचशे किलो गांजा जप्त
नाशिक: आधी एटीएम मशीन फोडले आणि मग थेट पळवूनच नेण्याचा प्रयत्न…
नाशिक: सिटीसेंटर रोडवर बिबट्याचे दर्शन झाल्याने दिवसभर नागरिकांत भीती