नाशिक: फोटो व्हायरल करण्याच्या धमक्यांना कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Shops. Office Space On Rent At Canada Corner, Nashik. Click here

नाशिक: फोटो व्हायरल करण्याच्या धमक्यांना कंटाळून विवाहितेची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): प्रियकराच्या जाचामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्रियकराने वारंवार फोन करत तू मला भेटत नाही, असे म्हणत त्याच्याकडील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेचा मानसिक छळ केल्याने तिने आत्महत्या केली.

याप्रकरणी संशयित रवींद्र गोविंद आल्हाटे (रा. पेठरोड) याच्या विरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्ररीनुसार, मुलीचे लग्न झाले आहे. तिच्या ओळखीचा संशयित हा मुलीला नेहमी कॉल करून मला भेट असे म्हणायचा. असे नाही केले तर त्याच्याकडील तिचे फोटो व्हायरल करण्याची तसेच मुलीच्या लहान मुलाला मारून टाकेन अशा धमक्या देत मुलीचा संशयिताने मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली.