नाशिक: फायनान्सची नोकरी गेली तर पठ्ठ्याने दुचाकी चोरी सुरु केली; २० दुचाकी हस्तगत

नाशिक: फायनान्सची नोकरी गेली तर पठ्ठ्याने दुचाकी चोरी सुरु केली; संशयिताला अटक- २० दुचाकी हस्तगत

नाशिक (प्रतिनिधी): फायनान्स कंपनीचे कर्ज थकलेल्या गाड्या असल्याचे सांगत चोरीच्या २० दुचाकी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.

राहुल देविदास मुसळे (वय: ४४, राहणार त्रिमूर्ती चौक) असे या संशयिताचे नाव आहे.

गंगापूर पोलिसांनी सिटी सेंटर मॉल येथे ही कारवाई केली.

या संशयिताकडून चोरीच्या २० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

पोलीस पथकाचे गिरीश महाले यांना गुप्त माहिती मिळाली होती.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला. पथकाने सिटी सेंटर मॉल येथे सापळा रचत संशयित राहुल मुसळेला ताब्यात घेतले. संशयिताने चोरी केलेल्या दुचाकी फायनान्स कंपनीने ओढून आणल्याचे सांगत विविध ग्राहकांना विक्री केल्या. सातपूर येथील एका फायनान्स कंपनीच्या गोदामात ग्राहकांना गाडी दाखविण्यास घेऊन जात होता. येथे व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाने पाहिलेली गाडी न देता तो चोरी केलेली दुचाकी विक्री करत असे.

नाशिक: 25 वर्षीय प्रियकराचा लग्नास नकार; महिलेने केले आत्महत्येस प्रवृत्त! मृतदेह महामार्गावर

संशयिताने शहरातील ठक्कर बाजार, राजीव गांधी भवन समोरील संकुल, त्रिमूर्ती चौक, भद्रकाली परिसर येथून सर्रासपणे दुचाकी चोरल्या होत्या. संशयित मुसळे हा एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये वसुली एजंट म्हणून काम करत होता. त्याच्याकडे दुचाकीचे थकीत हप्ते वसूल करण्याचे काम होते. त्याच्याकडे दुचाकीच्या डुप्लिकेट चाव्या होत्या. चोरी केलेल्या ह्या दुचाकी तो अवघ्या पाच हजारात विकत होता अशी माहितीही समोर आली आहे.