नाशिक पोलिसांचं वरातीमागून घोडं!

नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून शहरात जवळजवळ रोज सोसाखळी चोरीच्या घटना समोर येत आहेत. त्यानंतर अनेकदा पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सोनसाखळी चोरट्यांना खाकीचा धाक उरला नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांना रोख लावण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे.

यामध्ये १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एखादी सोनसाखळी चोरीची घटना घडली तर यामध्ये निवड केलेल्या ५२ पॉईंटपैकी एका पॉईंटवर झिक-झॅक पद्धतीने नाकेबंदी करण्यात येईल. ही नाकाबंदी २ तास लावण्यात येणार आहे. त्यामुळे संशयित दुचाकी पकडण्यासाठी पोलिसांना मदत होणार आहे.