नाशिक: पिस्तुलाचा धाक दाखवत ५० लाख लुटले

नाशिक (प्रतिनिधी): महिलेला घरात डांबून १५ लाखांची रोकड, सात किलो सोने, ११ किलो चांदी आणि गृह्पोयोगी वस्तूंची चोरी करत पतीचे बनावट मृत्यूपत्र मालमत्तेवर नाव लावून फसवणूक केल्याची तक्रार मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि मंजितकौर चढ्ढा यांच्या तक्रारीनुसार, संशयित अनंत सांगळे, रामदास गोरे, अभिजित गुजराल, आणि एक महिला यांनी चढ्ढा यांच्या पतीचे बनावट मृत्यूपत्र तयार करून मालमत्तेवर नावे लावून फसवणूक केली. तसेच महिलेला व तिच्या मुलास घरात डांबून ठेवत पिस्तुलाचा धाक दाखवत घरातील एेवज चाेरी केल्याची तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.