नाशिक: नेट बँकिंगचा पासवर्ड बदलून सायबर चोरटयांनी केली १ कोटी रुपयांची ऑनलाईन खरेदी !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील म्हसरूळ भागात अज्ञात इसमाने स्टेट बँक ऑफ इंडिया च्या बँक खाते क्रमांकाद्वारे ऑनलाईन वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी केली. यामध्ये चोरट्याने १ करोडची खरेदी केली तर, उर्वरित रक्कम एटीएमच्या माध्यमातून काढून घेतली.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलम आत्माराम माने (वय २६, रा.मेरी हॉस्टेल पोस्ट ऑफिस जवळ मेरी परिसर पंचवटी नाशिक) या त्यांच्या मूळगावी गेल्या होत्या. दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या दिंडोरीरोड म्हसरूळ स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मेरी बँक खाते क्रमांकावरून, फिर्यादीच्या नावाने ईमेल चेंज करण्याची खोटी रिक्वेस्ट पाठवली. तसेच फिर्यादी यांच्या खात्यातून, संशयिताने नेटबँकिंग द्वारे वेगवेगळ्या वस्तू खरेदी करून, तर एटीएमने काही पैसे काढून असे एकूण १ करोड ९७ लाख ९७ हजार १७४ रुपये गंडवले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.