नाशिक-नगर हद्दीवर दोन चेक पोस्ट, जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची चौकशी

नाशिक (प्रतिनिधी): सरकारने जाहीर केल्याप्रमाणे गुरुवारी रात्री आठ वाजेपासून जिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नाशिक-पुणे मार्गावर कऱ्हे घाटात तर सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहेत.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील, ग्रामीण अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक एस. बी. कोते यांनी जिल्हा हद्दीवर चेकपोस्टचे नियोजन केले. एक अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांचा एका चेकनाक्यावर समावेश आहे. हे चेकपोस्ट २४ तास कार्यरत राहणार आहेत. मार्गदर्शक तत्त्वानुसार आवश्यक त्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहेत.