नाशिक: टोळक्याने केली तरुणाला मारहाण; धारदार शस्त्राने वार

नाशिक: टोळक्याने केली तरुणाला मारहाण; धारदार शस्त्राने वार

नाशिक (प्रतिनिधी): सिडको भागात रविवारी दुपारी एका युवकावर गुंडांच्या टोळीने धारधार शस्त्राने वार केले.

यात हा युवक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

या प्रकाराने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, सिडकोतील रायगड चौक परिसरातील शिवनेरी उद्यान भागात मोहन बाळकृष्ण देवकर (वय १८, रा. कामटवाडा, नाशिक) याच्यावर पूर्ववैमनस्यातून टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जिल्हा रुग्णालयात युवकावर उपचार सुरू आहेत. मोहन उद्यान परिसरातून जात असताना समोरून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने कुरापत काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान टोळक्यातील एका तरुणाने जवळील कोयत्याने मोहनवर वार केले. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले असून पोलिसांकडून संबंधित टोळक्याचा शोध घेतला जात आहे. टोळक्यातील बहुतांश मुले अल्पवयीन असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
BREAKING: डम्पर-कार अपघातात नाशिकच्या डॉक्टरचा मृत्यू!
नाशिक: वडिलांच्या निधनानंतर एकुलत्या एक मुलाची आत्महत्या
कसारा घाटातील दरीत ट्रक कोसळला; चालक जागीच ठार