नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि.२९ जुलै) ५६९ पॉझिटिव्ह; शहरात ३८१ तर ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (जिल्हा प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २९ जुलै) एकूण ५६९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात ग्रामीण १६७, नाशिक शहर ३८१, मालेगाव २१, जिल्हा बाह्य १ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण १२ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रात ११, नाशिक ग्रामीणमध्ये ० मृत्यू झाले आहेत तर जिल्हा बाह्य एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे जिल्ह्यात बुधवारी एकूण ५०९ रुग्ण बरे झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात बुधवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

नाशिक शहरात बुधवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

नाशिक शहरात बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) जेलरोड, नाशिकरोड येथील ६७ वर्षीय वृद्ध महिलेची निधन झालेले आहे. २) डिया हाईट्स,सातपूर,नाशिक येथील ५४ वर्षीय  पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) पूजा रेसिडेन्सी, टायगर नगर, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) जेलरोड, नाशिकरोड येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ५) त्रिमूर्ती  निवास, अशोक नगर, सावरकरनगर,सातपूर येथील ७७ वर्षे वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) गजानन पार्क, लक्ष्मीनगर, सिडको येथील ४९ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ७) श्रीनगर चौक, कामगार नगर येथील ५१ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) सावली पार्क, हिरे नगर,पुणा रोड, नाशिक येथील ७६ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ९) नाशिकरोड, नाशिक येथील ३६ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १०) त्रिमूर्ती नगर, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ११) श्रमिक नगर, सातपूर येथील  ४७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.