नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी मालेगावात

नाशिक: शहरात काल पहिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला असतानाच, माळेगावमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. नाशिक शहरात गोविंद नगर भागातील एक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर मालेगावात आज कोरोनाचा पहिला बाली गेला आहे. हा रुग्ण सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह होता. तर या व्यतिरिक्त अजून पाच पॉझिटिव्ह रुग्ण मालेगावात रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणे वर प्रचंड दबाव आला आहे. नागरिकांनी आता घराबाहे पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.