नाशिक जिल्ह्यातील निर्बंधांबाबत महत्वाची बातमी…

नाशिक जिल्ह्यातील निर्बंधांबाबत महत्वाची बातमी…

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्याभरतील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थित आज (दि. ४ सप्टेंबर) साप्ताहिक कोरोना आढावा बैठक संपन्न झाली. जिल्ह्यात सध्या तरी कुठलेही नवीन निर्बंध नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे, मात्र…

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची तयारी होत आहे. संभाव्य कालावधीपूर्वीच शहरात कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याचा संशय महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने व्यक्त केला आहे. महिनाभरात नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या फक्त 100 ने कमी झाली आहे. अशी माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नियोजन भवन या ठिकाणी कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

नाशिक जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण संख्येत महिन्याभरात फक्त 100 रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका हा नाशिककरांवर अजून कायम असल्याचे आजच्या आढावा बैठकीत समोर आले आहे… तर जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर 2.58 टक्क्यांवर असून जिल्ह्यात 36 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. म्युकरमायकोसिस रुग्ण संख्येत देखील घट झाल्याने कुठेतरी दिलासा मिळाला असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हंटलं आहे.

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबाबत कडक निर्बंध नसून योग्य ती खबरदारी नागरिकांनी घ्यावी व ग्रामीण पोलिसांनी देखील याकडे लक्ष ठेऊन राहावे अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या आहेत… येणाऱ्या गणेशोत्सवासंदर्भात महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त हे नियोजन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आलेय.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
गंभीर आजाराशी लढणाऱ्या नाशिकच्या राजाभाऊ बोडकेंना गरज आहे तुमच्या आर्थिक मदतीची…
रेमडेसिव्हीर व टॉसीलीझुमॅब मेडिकलमधून थेट वितरण होणार…
कोरोना निर्बंधांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा – भुजबळ