नाशिक जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा उपचार पद्धती लवकरच !

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा शासकीय रूग्णालयात प्लाझ्मा उपचार पद्धती येत्या दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये साधारण 300 स्वॅबची तपासणी करण्यात येत असून 20 व्हेंटीलेटर बेडस् कार्यान्वित आहे, असेही  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदाळे यांनी सांगितले.

ग्रामीण भागांमध्ये रूग्णांची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रयत्न

ग्रामीण भागात प्रत्येक रूग्णाला योग्य उपचार मिळण्यासाठी व त्यांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी, अर्सेनिक अल्बम, आर्यन अशा औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. आज ग्रामीण भागात 1 हजार 500 रूग्णांवर उपचार सुरू असून 600 रुग्णांचे घरीच विलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बैठकीत सादर केली.