नाशिक: आधी गुंगीचं औषध देऊन बलात्कार मग व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार

नाशिक: आधी गुंगीचं औषध देऊन बलात्कार मग व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार

नाशिक (प्रतिनिधी): आधी गुंगीचं औषध देऊन २०१६ मध्ये बलात्कार केला. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करायची धमकी देत २०१७ ते २०१९ मध्ये वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार एका महिलेसोबत नाशिकमध्ये घडला आहे. या प्रकाराबाबत महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे.

महिलेने दिलेली फिर्याद आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी पावन विश्वास वाघ (राहणार: सिडको, साईबाबा नगर, अंबड) याने एका महिलेला पाथर्डी फाटा येथील फ्लॅटमध्ये नेले आणि गुंगीचं औषध देऊन बलात्कार केला. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सन २०१७ ते २०१९ च्या दरम्यान हॉटेल सेलिब्रेशन आणि हॉटेल द पाम येथे नेऊन लैंगिक अत्याचारही केले. हे सगळं झाल्यानंतर संशयित आरोपीने महिला फिर्यादिसोबत लग्न करण्यास भाग पाडले मात्र ते रजिस्टर केले नाही. शिवाय फिर्यादीला त्याच्यासोबत घेऊन जाण्यास वेळोवेळी टाळाटाळ केली. आणि फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पावन विश्वास वाघ याच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर नंबर: ०१३०/२०२१) भारतीय दंड विधान ३७६ (२), ३२३, ४१७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या Bluetooth Headphone ने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे… तब्बल दोन लाख लोकांनी आतापर्यंत खरेदी केला हा Bluetooth Headphone.. तुम्ही खरेदी केला का ?