नाशिक: आधी एटीएम मशीन फोडले आणि मग थेट पळवूनच नेण्याचा प्रयत्न…

नाशिक: आधी एटीएम मशीन फोडले आणि मग थेट पळवूनच नेण्याचा प्रयत्न…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या विल्होळी गावातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम चोरट्यांनी मंगळवारी (14 जून) मध्यरात्री फोडले आहे.

पहाटे साडेतीन वाजता हा प्रकार घडला आहे.

एटीएम फोडण्याचा सर्व प्रकार एटीएम मध्ये असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तालुका पोलिस ठाण्यात याची तक्रार करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, विळोली येथे महाराष्ट्र बँकेची शाखा आहे.

या शाखेला लागूनच बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये मंगळवारी रात्री काही चोर आले होते. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दोन ते तीन तरुण चारचाकी वाहनातून आले. वाहनातून उतरून या चोरांनी एटीएम रूममध्ये प्रवेश केला. त्यांनी एटीएम मशीन फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी एटीएम मशीन काढण्याचा प्रयत्न केला. आत असलेले सीसीटीव्हीसुद्धा चोरांनी फोडले. यानंतर मशीन काढून त्यांनी ते बाहेर आणले. मात्र मशीन गाडीत टाकता न आल्याने एटीएम मशीन बाहेर सोडून चोरांनी पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली होती, त्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे