नाशिकला कोरोनामुक्त करण्यासाठी नगरसेवकही पुढे सरसावले…

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच महापालिकेसोबतच आता नगरसेवकसुद्धा पुढाकार घेतांना दिसत आहेत. कोरोनाला नाशिकमधून हद्दपार करण्यासाठी महापालिकेकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेला यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा भासत असल्याने नगरसेवकांनीही महापालिकेला मदतीचा हात दिला आहे.  

नगरसेवकांच्या पुढाकाराने विविध परिसरांमध्ये कोरोना तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत वडाळा परिसरात केलेल्या ३२५ जणांच्या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. तसेच पंचवटी परिसरात एकूण ५६६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ५३ जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. जुने नाशिक भागात असलेल्या रहेनुमा शाळेत कोरोना चाचणी केली असता ५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. नाशिकरोड परिसरात दिवसभरात ४२३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये २५ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.