नाशिकलाच होणार ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

नाशिक (प्रतिनिधी) : यंदाचे ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथेच होणार असल्याचे अखिल भारतीय महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी स्पष्ट केले आहे. हे संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

साहित्य महामंडळाने स्थळनिवडीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून यंदा होणारे ९४ वे साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी नाशिकची निवड केली.