नाशिकरोड: अज्ञात समाजकंटकांकडून चारचाकी वाहनाची तोडफोड

नाशिकरोड: अज्ञात समाजकंटकांकडून चारचाकी वाहनाची तोडफोड

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड परिसरात काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकरोड येथील मालधक्का परिसरात राहणारे विकी चंद्रमोरे यांचे स्वतःच्या मालकीचे चार चाकी वाहन दारापुढे उभे असताना काल मध्यरात्री बाराच्या सुमारास काही समाजकंटकांनी अंधाराचा गैरफायदा घेत, वॅगन आर गाडी नंबर एम. एच. ४३ वि. १८७६ च्या मागील बाजूच्या संपूर्ण काचेची तोडफोड करून, परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.

यापूर्वीही याच परिसरातील देवळाली गाव राजवाडा अमरधाम समोरील उभ्या असणाऱ्या चार ते पाच वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. तसाच प्रकार कालही घडल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या टवाळखोरांविरोधात नाशिकरोड पोलिसांनी कडक पावले उचलून कठोर अशी कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी नाशिकरोड आणि परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी असाही नागरिकांमध्ये सूर आहे.
Android मोबाईल वापरताय? बोट्स कंपनीच्या ब्लूटूथ इअर बड्सवर इथे मिळतोय मोठा डिस्काउंट !