नाशिकमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; रॅगिंग होत असल्याचा कुटुंबियांचा आरोप

नाशिकमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; रॅगिंग होत असल्याचा कुटुंबियांचा आरोप

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. रॅगिंग झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला, त्यानंतर नाशिकमध्ये एकच खळबळ माजली आहे.

संशयास्पद मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे नाव स्वप्निल शिंदे असं आहे. दोन सीनियर मुलींकडून रॅगिंग केली जात होती आणि या त्रासाला कंटाळून मुलाचा घातपात झाल्याचा आरोप स्वप्निलच्या कुटुंबाने केला आहे.

मागील काही दिवसांपासून दोन मुलींकडून स्वप्निल यांचा छळ होत होता, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तसेच याबाबत कॉलेज प्रशासनाला याआधी कल्पना दिली होती. पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कॉलेज प्रशासन आणि दोन सीनियर मुलींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. स्वप्नीलकडे आढळून आलेल्या सु’सा’इड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणार्‍यांची नावेही दिली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

कुटुंबियांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे कॉलेज प्रशासनाकडून खंडन करण्यात आले आहे. याबाबत कॉलेजच्या प्राचार्या मृणाल पाटील यांनी सांगितले की, मयत झालेल्या विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचार सुरू होते. रॅगिंग होत असल्याबाबतची कोणीतीही तक्रार स्वप्नील किंवा त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आली नव्हती. याप्रकरणी यापूर्वीही त्याच्या पालकांना बोलावण्यात आले होते. फेब्रुवारीपासून तो बीड येथील त्याच्या घरी होता. जूनमध्ये तो कॉलेजला परतल्यानंतर त्याच्या आईला त्याच्यासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याची आई त्याच्यासोबत येथेच राहत होती मात्र त्यांनीही आपल्याकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचे प्राचार्या पाटील यांनी सांगितले

आडगाव पोलिस ठाण्यात स्वप्निल शिंदे यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
बायोडिझेल पंपावर छापा; माजी आमदाराचा भाऊ चालवत होता हा पंप!
नाशिकमध्ये तरुणाच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या मित्रांवर खु’नाचा गुन्हा
चक्क साड्यांच्या बॉक्समधून सुरु होती गुटख्याची वाहतूक.. दोन जण अटकेत !