नाशिकमध्ये रेडीरेकनरच्या दरात ०.७४ टक्के वाढ!

नाशिक (प्रतिनिधी) : रेडीरेकनर चे नवे दर जाहीर झाले असून नाशिक महानगर पालिका क्षेत्रात  सरासरी ०.७४% दरवाढ झाली आहे. हे नवे दर आज (दि.१२) पासून लागू झाले आहेत. मिळकतीचे बाजार मूल्य दर वर्षी निश्चित करून शासनाकडून जाहीर केले जातेत्या पेक्षा कमी दरात व्यवहार केला जात नाही. मुद्रांक शुल्क याच दारावर व्यवहार करताना मोजावा लागतो.

गेल्या वर्षी आर्थिकवर्ष १ एप्रिल पासून नवे दर लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता परंतु कोरोनाची परिस्थिती बघता नवीन दर जाहीर करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिली गेली होती. अखेर काल (दि.११) नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी या दरवाढी वर घोषणा केली.

जाणून घ्या रेडीरेकनर म्हणजे काय?

बांधकाम व जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराला नोंदणी साठी मुद्रांक विभागाच्या वतीने मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाते. सबंधीत जमीन व इमारतीच्या वेगवेगळ्या निकषानुसार आणि विभागानुसार वार्षिक बाजार मूल्य ठरविले जाते त्याला रेडीरेकनर म्हणतात. ठरविलेल्या रेडीरेकनरच्या दरानुसार कमी किमतीचा व्यवहार झाला तरी मुद्रांक शुल्क भरावा लागतो. प्रत्येक भागानुसार रेडीरेकनरचे दरवेगळे असतात.