नाशिकमध्ये ‘गुगल’ने शोधला चोर!

नाशिक (प्रतिनिधी) : बातमी वाचून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की नाशिकमध्ये गुगल ने चोर कसा शोधला असेल? तर गुगल हा नाशिकच्या पोलीस दलातील श्वान आहे. काही दिवसांपूर्वी अंबड परिसरातील खोडे मळा परिसरात घरफोडी झाली होती. सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. त्या घरफोडीचा छडा पोलीस दलातील गूगल नावाच्या या श्वानाने लावला.

खोडे मळ्यातील घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तापासाची सूत्रे फिरवत सदर ठिकाणी पाहणी करत असताना एक हातमोजा आढळून आला. घरातील सदस्यांना याची विचारणा केली असता हा मोजा घरातील सदस्यांचा नसल्याचे सांगण्यात आले. हा मोजा तपासासाठी पुरावा म्हणून श्वानासाठी पुरेसा ठरला. मोज्यांचा सुगावा गूगलला देण्यात आला आणि वासाच्या मागे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. गुगलने घराच्या गेटने बाहेर जात (घटनास्थळावरून) परत मागील बाजुने शेतामधून खोडेमळा, बडदेनगरने अडगळीच्या मार्गाने पळत जात इंदिरा गांधी वसाहत झोपडपट्टी येथील महादेव मंदिराच्या शेजारील गल्लीत एका अडगळीच्या घरात जाऊन पोहचला. आणि संशयित चोरट्यावर भूंकण्यास सुरुवात केली. संशयित पोलिसांना पाहून चोरी मी केली नाही असे सांगू लागला. त्यासाठी पोलिसांनी चार ते पाच जणांना  एका रांगेत अभे करून  ओळखपरेड घेतली असता गूगल श्वानाने सर्वांचा सुगावा घेतला व पुन्हा संशयिता कडे पाहून भूंकण्यास सुरुवात केली. लगेच पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले.