नाशिकमधील ६१ फार्मासिस्टचे परवाने रद्द!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील अन्न व औषध विभागाच्या वतीने मागील दोन महिन्यांत कारवाई करण्यात आल्या. याअंतर्गत नाशिक शहरासोबतच जिल्ह्यातील एकूण ६१ फार्मासिस्टचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

गेल्या दोन महिन्यांमध्ये शहरातील ४४ आणि ग्रामीणचे १७ अशा एकूण ६१ फार्मासिस्ट परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये औषधांचा अवैधरीत्या साठ करून ठेवणाऱ्या इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.