नाशिकमधील पाच रेल्वे फाटकांवर होणार उड्डाणपूल!

नाशिक (प्रतिनधी) : नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर एकूण १४ रेल्वे क्रॉसिंग आहेत. त्यापैकी आता ५ ठिकाणी रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपूल किंवा अंडरपास उभारण्याचा रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतला आहे.

उरलेल्या ८ ठिकाणी सुद्धा अंडरपास बांधण्यासाठी मंजुरी मिळणार आहे. यामुळे आता रेल्वे फाटकांवरील होणारे अपघात सुद्धा कमी होणार आहेत. तसेच यामुळे इंधनबचत सुद्धा करता येणार आहे. या पाच रेल्वे फाटकांपैकी नाशिकरोड येथील गेट नंबर ९०, देवळाली येथील गेट नंबर ८५, ओढा येथील गेट नंबर ९२, अस्वली येथील गेट नंबर ८३डी.एन आणि लहवीत येथील गेट नंबर ८४/१ अशा ठिकाणी अंडरपास उभारण्यात येणार आहेत. अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.