नवीन बिटको रुग्णालयात येत्या १५ तारखेपासून कोरोना सेंटर होणार सुरु

नाशिक (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस वाढत चाललेले कोरोना रुग्ण लक्षात घेता महानगरपालिका प्रशासन महत्वाची पाऊले उचलतांना दिसतय. नाशिकरोडमधील मनपा विभागीय कार्यालयाशेजारी असलेल्या नवीन बिटको रुग्णालयात ४०० बेडचे कोरोना सेंटर उभारण्यात आले आहे. या कोरोना सेंटरला १५ जुलैपर्यंत सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.