नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने केली कौतुकास्पद कामगिरी…!

नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपूर्वी देवळाली गावात एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती. नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तब्बल १० दिवसात या गुन्ह्याचा तपास लावत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

१५ नोव्हेंबर २०२० रोजी देवळाली गावात राहणाऱ्या योगेश पन्नालाल चायल या इसमावर चाकू आणि कोयत्याने वार करून आरोपी पळून गेले होते. त्यानंतर गुप्तहेरांकडून या गुन्ह्याची कडी पोलिसांच्या हाती लागली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हर्ष सुरेश म्हस्के (वय १९, रा. शिवगंगा अपा. मच्छी मार्केटजवळ, जेलरोड) हा उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पथक तयार करून सप्ला रचून या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले. हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.