नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामाध्येही कोरोनाचा शिरकाव

नाशिक (प्रतिनिधी) : ठिकठिकाणी कारागृहात कोरोनाचे रुग्ण सापडत असतांना नाशिकच्या अम्ध्यावर्ती कारागृहात सुद्धा आता कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. नाशिकरोडच्या कारागृहात तीन हजारांहून अधिक कैदी असून त्यातील पाचशे कैद्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार सोडण्यात आले होते. परंतु तरीही कारागृहातील ८ आरोपींची कोरोन टेस्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती मिळतेय.

बाहेरगावून आलेल्या तात्पुरत्या कारागृहात राहणाऱ्या कैद्यांची संख्या ४०० च्या वर पोहोचली आहे. त्यामुळे या ठिकाणी सामाजिक अंतर पाळले जात नसल्याने उर्वरित कैद्यांना मध्यवर्ती कारागृहात पाठवण्याचा निर्णय केला. यावेळी वैद्यकीय तपासणी सुरु असतांना बुधवारी (दि.१५) रात्री सहा आणि गुरुवारी (दि.१६) दोन अशा एकूण ८ कैद्यांची कोरोन चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.