नाशिकच्या पोलीस अकादमीमधील कर्मचारी वसाहतीत महिलेची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील महाराष्ट्र पोलीस अकादमीमधील कर्मचारी वसाहतीत एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सौ.पल्लवी प्रमोद गायकवाड (वय ३०) या कर्मचारी वसाहत घर क्रमांक ए.बी.१० येथे राहत होत्या. दरम्यान, रविवारी (दि.१७ जानेवारी) रोजी घरात कोणीच नसतांना पल्लवी यांनी घरातील छताच्या पंख्याच्या लोखंडी काडीला ओढणी व साडीच्या साहाय्याने गाठ बांधून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती जितेंद्र दिवे यांनी पोलिसांना फोनद्वारे दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सदर महिला ही ५ ते ६ महिन्यांची गरोदर होती.