⚡ नाशिकच्या ‘त्या’ हिंदू मुस्लीम विवाहाला मंत्री बच्चू कडू यांचा पाठींबा !

नाशिकच्या ‘त्या’ हिंदू मुस्लीम विवाहाला मंत्री बच्चू कडू यांचा पाठींबा !

👉 जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
नाशिकमध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजात होणाऱ्या एका लग्नसोहळ्याची पत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरतेय. मात्र या संपूर्ण प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग देण्यात आल्याने तसेच काही कट्टरवाद्यांच्या धमक्यांमुळे हे लग्न रद्द करण्याची वेळ वधू आणि वर कुटुंबियांवर आली आहे. मात्र अशातच मंत्री बच्चू कडू यांनी या कुटुंबाला भेट देत पाठिंबा या लग्नाला दर्शवला आहे.

नाशिक मध्ये राहणाऱ्या एका हिंदू परिवारातील तरुणीचे एका मुस्लिम समाजाच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार 21 मे रोजी दोघांनी कोर्ट मॅरेज  केले होते. विशेष म्हणजे संबंधित तरुणी ही दिव्यांग असतांनाही मुलाने कुठलीही अट समोर ठेवली नाही. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात ना, त्यानुसारच काहीसं या दोघांमध्ये देखील दिसून आले. वर मुलाने स्व-ईच्छेने हे लग्न करण्याची तयारी दर्शवल्याने वधू कुटुंबीय देखिल खूश होते. नोंदणी पद्धतीने विवाह तर झाला, मात्र मुलीच्या घरच्यांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा नातेवाईकांच्या उपस्थितीत थाटामाटात करण्याचा निर्णय घेतला..

त्यानूसार दोन्ही धर्माच्या कुटुंबातील सदस्यांची लग्नाबाबत झालेली चर्चा यशस्वी झाली. त्यानंतर हा सोहळा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत १८ जुलै २०२१ रोजी शहरातील तिडके कॉलनी परिसरातील एका हॉटेलमध्ये करण्याचे ठरले. मात्र लग्न पत्रिका छापणे हे या परिवारासाठी मोठे अडचणीचे ठरले काही.. काही संघटनांनी हा लग्न सोहळा होऊ न देण्याच सांगण्यात आले.. कट्टरवाद्यांनी दोघांची लग्न पत्रिका वायरल करत त्याला लव जिहाद चे स्वरूप दिले, ज्याचा त्रास हा दोघा परिवारातील लोकांना सहन करावा लागला. नाशिक दौऱ्यावर असलेल्या मंत्री बच्चू कडू यांनी या कुटुंबाची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवलाय.

तर धर्माच्या आड सोंग घेऊन सदर कुटुंबाला कट्टरवाद्यांनी याला वेगळं स्वरूप देऊ नये व आपण या कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे म्हंटले आहे.. दोघांच्या कुटुंबीयांनी आपल्याला पाठिंबा दर्शविल्याने वर आणि वधू यांच्यात मोठं आनंदाचे वातावरण आहे… त्यामुळे आता हा विवाह सोहळा कसा होणार याकडे लक्ष लागून आहे..