नाशिकच्या चेतन राजापुरकरांच्या नाणेसंग्रहाची गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये नोंद!

नाशिक (प्रतिनिधी) : राष्ट्रीय मुद्रा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तसेच नाशिकचे प्रसिद्ध नाणे संशोधक चेतन राजापूरकर यांच्याकडे असलेल्या नाणेसंग्रहाची गिनीज बुक रेकॉर्ड तसेच वंडर बुक रेकॉर्ड लंडन मध्ये नोंद झाली आहे.

चेतन राजापूरकर यांना दुर्मिळ नाण्यांचा अभ्यास करण्याचा आणि त्यांना संग्रहित करून ठेवण्याचा छंद आहे. त्यांच्या या संग्रहामध्ये सुमारे ६०० ते ८०० वर्षांपूर्वीची दुर्मिळ नाणी आहेत. राजापूरकरांच्या या नाणीसंग्रहाची जागतिक पातळीवर नोंद करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते काल (दि.०४) चेतन नागपूरकर यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.