नाशिकचे मध्यवर्ती रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालय पुन्हा सुरु….

नाशिक (प्रतिनिधी) : लॉकडाऊन सुरु झाल्यापासून रेल्वे सेवा पूर्णपणे बंद होत्या त्यामुळे आरक्षण केंद्रे सुद्धा बंद ठेवण्यात आली होती. मात्र रेल्वे पुन्हा सुरु झाल्याने आता आरक्षण केंद्रे सुद्धा सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांना रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकात जावे लागायचे परंतु आता प्रवाशांना सोयीचे व्हावे म्हणून नाशिक शहरात मध्यवर्ती ठिकाणी रेल्वेने आरक्षण कार्यालय पुन्हा सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकच्या शरणपूर रोड येथील पालिका बाजारात असलेले रेल्वे आरक्षण केंद्र पुन्हा सुरु झाले आहे.