नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. अनेक लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. दोन-तीन दिवसांपासून हेमंत गोडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले.

खासदार हेमंत गोडसे यांनी ट्विट करून ही माहिती दिली. तसेच “माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करून घ्यावी. मी यशावकाश माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरु ठेवेन आणि परिस्थितीचा आढावा घेत राहीन” असे सुद्धा ते म्हणाले.