नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच?

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी व्यक्त केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलतांना संजय राऊत यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे सांगितले आहे. तसेच मुंबईमध्ये सुद्धा पुढचा महापौर हा शिवसेनेचाच असेल असेही राऊत यांनी स्पष्ट केले. मुंबईमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे तर नाशिकमध्ये शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे असे राऊत म्हणाले. तसेच कुणीही कुणाबरोबर गेलं तरी सध्याची परिस्थिती बदलणार नाही. असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.