नाशिककरांनो, आता मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड !

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील कोरोनाची परस्थिती बघता शहरात रोजच्या रोज सरासरी हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणूंन मास्क बंधनकारक केला आहे. या पुढे सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता   फिरणाऱ्याकडून ५०० रुपये दंड सक्तीने वसूल करावे तसेच पोलिसांच्या मदतीने लवकरात लवकर मोहीम हाती घ्यावी असे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले.

नगरपालिकेतील प्रतिष्ठितांनी विविध विषयांना अनुसरून लक्षवेधी सूचना मांडत चर्चेची मागणी केली होती. त्यानुसार काल मंगळवारी (दि.१५) महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली  आणि आयुक्त कैलास जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेची ऑनलाईन महा सभा झाली.या महासभेत २२ नगरसेवकांनी आपले मत मांडले हि सभा तब्बल साडेसहा तास चालली.