नाशकात पुढील दोन दिवसांत वादळी पावसाची शक्यता…

नाशिक (प्रतिनिधी) : राजस्थान आणि गुजरात राज्यामधून मान्सून परतल्यानंतर आता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात सध्या परतीचा प्रवास पावसाचा सुरू आहे. त्यांच्याच परिणाम राज्यातील हवामान बदलावर झाला आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, विदर्भात मुसळधार परतीच्या पावसाळ्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये व नाशिक जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत वादळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक शहरात ऑक्टोबर हिटचा चटका जाणवत आहे. तर दुसर्‍या बाजूला दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असून,१५ व १६ ऑक्टोंबर रोजी वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दर्शवला आहे. आत्तापर्यंत शहरात सप्टेंबरच्या  शेवटीपर्यंत ९५१.६ मिलीमीटर तर, ऑक्टोबर महिन्यामध्ये ३०.७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.शहरात दोन दिवसांपासून वाऱ्याचा वेग मंदावला आहे. प्रतितास ३.६ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे ‌दमटपणा वाढला आहे. सध्या शहरातील कमाल तापमान अंश सेल्सियस आहे.तर किमान तापमान २१ अंश सेल्सियस इतके आहे.