नाशकात पहिल्या टप्प्यात होणार ३० हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण…

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी धोका मात्र टळला नाहीये. त्यामुळे शासनाने लसीकरणेची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ६ दिवसांत जिल्ह्यातील एकूण ३० हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे.

नाशिकमध्ये लसीकरणाची मोहीम सुरु असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आरोग्य, पोलीस, आणि गृहरक्षक दल अशा एकूण ३० हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ६० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.