नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची चिन्ह…

नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून शहराच्या तापमानात सतत बदल होत असल्याचे हवामान खात्याने नोंदवले होते. शहराचे हवामान सातत्याने बदलत आहे. याचाच अनुभव नाशिककररही घेत आहेत. नोव्हेंबर महिना उलटून गेला असला तरी अजूनपर्यंत नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागलेला नाही.

यावेळी नाशिकच्या किमान तापमानाचा पारा १६ अंशावरून घसरण होऊन थेट १३ अंशावर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा एकदा नाशिककरांना बदल जाणवायला लागला आहे. तसेच पहाटे आणि दिवसभर गारठा जाणवू लागला आहे. येत्या काही दिवसात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.