नव्या वर्षानिमित्त सप्तशृंगी गड आणि साईबाबा मंदिर २४ तास खुले राहणार !

नाशिक (प्रतिनिधी): नव्या वर्षानिमित्त शिर्डीचे साई बाबा मंदिर आणि वणीचं सप्तशृंगी मंदिर २४ तास खुले राहणार आहे, असे मंदिर संस्थानाने स्पष्ट केले आहे. नव्या वर्षानिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. पण कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक सगळे नियम पाळावे लागणार आहेत. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करूनच मंदिरात प्रवेश करता येईल.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक

मंदिरे खुली असली तरी कमीत कमी गर्दी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला मोठ्या प्रमाणात राज्यातून भाविक सप्तशृंगी गडावर तसेच शिर्डीला दर्शनासाठी जातात. यावेळेला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.