नगरसेवकाची हत्या करून पळालेला लोंढे नाशिकमध्ये अटक ; छोटा राजन गँगशी संबंध

नाशिक (प्रतिनिधी) : दमण येथील नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करून, पळ काढलेल्या सुपारी किलर लोंढे याला नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे. ८ महिन्यापासून फरार असलेल्या जयराम लोंढे (रा. देवळाली गाव) या संशयितांचा छोटा राजन गँगशी संबंध असल्याचा संशय वर्तविला जात आहे.

नाणी दमण या केंद्रशासित प्रदेशाचे नगरसेवक असलेल्या सलीम अन्वर बारबटिया उर्फ सलीम मेमन याची हत्या लोंढेने केली होती. समुद्रकिनाऱ्यावरील भूखंड ताब्यात घेण्याच्या हेतूने गुजरातमधील एका व्यावसायिकाने ही सुपारी छोटा राजन टोळीला दिल्याचे समझते. कारमधून आलेल्या संशयित तसेच ५ जणांच्या टोळीने भरदिवसा बिचवर लोकांच्या गर्दीत नगरसेवक सलीम याच्यावर गोळी झाडून हत्या केली. या घटनेनंतर मारेकऱ्यानी पळ काढला. या प्रकरणी दमण पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तर ८ महिन्यापासून गायब असलेला या प्रकणातील संशयित आरोपी लोंढे दसऱ्याच्या सनानिम्मित नाशिक येथील त्याच्या घरी आला होता. माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने लोंढेला अटक केली. सदर कारवाई पोलिस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त संग्रामसिंग निशानदार, सहाय्यक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.