धार्मिक विधींसाठी गोदाघाटावर फक्त इतक्याच लोकांना प्रवेश

रामकुंड, गोदाघाट परिसरात धार्मिक विधी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते.

नाशिक (प्रतिनिधी): रामकुंड, गोदाघाट परिसरात धार्मिक विधी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते. या गर्दीमुळे कोरोना संसर्ग अधिक पसरण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी केवळ दोघांनाच प्रवेश देण्याचा निर्णय पुरोहित संघाने घेतला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुरोहित संघ, पंचवटी पोलिस ठाणे, पालिका अधिकाऱ्यांची बैठक होऊन विधींसाठी दोघांनाच प्रवेश देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच नागरिकांनीदेखील सहकार्य करण्याचे आवाहन पुरोहित संघाने केले आहे.