धक्कादायक : सॅनिटायझरने पेट घेऊन महिलेचा दुर्दैवी मृत्यू!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधील वडाळा गावात राहणाऱ्या एका महिलेचा घरात सॅनिटायझर मारत असतांना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रजबीया शेख असे या महिलेचे नाव आहे. घरात सॅनिटायझर मारत असतांना लाईट गेली. त्यामुळे रजबीया यांनी मेणबत्ती लावली. मेणबत्ती सुरु असतांना रजबीया या घरात सॅनिटायझर मारत होत्या. यावेळेस सॅनिटायझरच्या बॉटलने मेणबत्तीमुळे पेट घेतला. आणि सॅनिटायझरचा मोठा स्फोट झाला. या घटनेमध्ये रजबीया या ९० टक्के भाजल्या. त्यांनतर औषधोपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला.