धक्कादायक : नाशकात आढळली दोन बेवारस बालके

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात २ बेवारस बालके आढळून आल्याची घटना घडली आहे. सिन्नर येथील मोह शिवारातील शेतात एक ते दोन दिवसांचे बालक आढळून आले आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून त्याला घारपुरे घट आधाराश्रम येथे दाखल केले आहे.

तसेच नाशिकमधील समाज कल्याण कार्यालय परिसरात नासर्डीच्या पुलाजवळ तीन वर्षाची चिमुरडी बेवारस आढळून आली आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करून तिला आधाराश्रमात दाखल केले आहे. या चिमुकल्यांच्या पालकांनी ३० दिवसांच्या आत आधाराश्रमात संपर्क न साधल्यास त्यांच्या पुनर्वसनाचा विचार करण्यात येईल असे जिल्हा बालसंरक्षण संस्थेने सांगितले आहे.