धक्कादायक : दोनशेच रुपये पगार आल्याने राज्य परिवहनाच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या!

नाशिक (प्रतिनिधी) : आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य परिवहनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वेतन मिळाले नाही म्हणून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशोक ताटकुळे असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. मागील ३ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे.

मार्च महिन्यात लागू झालेल्या लॉकडाऊन नंतर राज्य परिवहन महामंडळ पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या अनेक कामगारांचे पगार रखडले गेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच नुकतंच जुलै महिन्याचा पगार कामगारांच्या हाती आला. आणि ताटकुळे यांच्या हातात चक्क जुलै महिन्याचा २२३ रुपये एवढाच पगार आला. ताटकुळे हे घरात एकमेव कमावणारे होते. या सगळ्या प्रकारामुळे नैराश्य आल्याने त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःला संपवले. त्यांच्या पश्चात मुलगी, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे.