दोन चिमुकल्या मुलींना सोबत घेऊन आईची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर तालुक्यातील पिंपरवाडी येथील एका ३० वर्षाच्या विवाहितेने आपल्या दोन लहान मुलींसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२३) ला घडला.

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव अनिता गायकवाड होते. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून तिने चार वर्षांची मुलगी ओवी व चार महिन्यांची चिमुकली अन्वी या दोघींना घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. महिलेच्या भावाने वावी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यावरून पोलिसांनी मनीषचा पती अनिल,  सासू मालन बाई, दिर व जाऊ या चौघांवर छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.