देहव्यापार अड्डा उद‌्ध्वस्त, १३ पीडित महिलांसह युवतींची पथकाकडून सुटका

नाशिक (प्रतिनिधी): विनयनगरमधील प्रभुदेवा अपार्टमेंटमध्ये देहव्यापार अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. बनावट ग्राहक पाठवून कारवाई करण्यात आली. यात १३ पीडित महिला व युवतींची सुटका करण्यात आली. मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहायक निरीक्षक सचिन सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी फिलोमिना शर्मा, अर्जुनसिंग चौहान तसेच सहा ग्राहकांना अटक करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या युवतींना वात्सल्य महिलागृहात ठेवण्यात आले आहे.