देवळालीच्या लष्करी क्षेत्राचे फोटो पाकिस्तानला पाठवणाऱ्या त्या इसमाला अटक!

नाशिक (प्रतिनिधी) : देवळाली कॅम्प येथील तोफखाना दलाच्या प्रतिबंधित क्षेत्राचे फोटो काढून ते पाकिस्तानच्या व्हाट्सअपद्वारे पाठवणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे. संजीव कुमार (रा. आलापूर, बिहार) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लष्करी हद्दीत सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी संशयित आरोपी मजूर म्हणून काम करत होता. २ ऑक्टोबरच्या रात्री संशयित संजीवकुमार हा मोबाईलमध्ये फोटो काढत असल्याचे तेथील सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर लष्कराने केलेल्या तपासणीत हे फोटो त्याने पाकिस्तानच्या व्हाट्सअप ग्रुपवर पाठवल्याचे आढळून आले. त्यामुळे लष्कराच्या सुभेदारांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संजीवकुमार विरुद्ध गुन्हा दाखल केला.