दुर्दैवी : २ वर्षाच्या चिमुकल्याचा दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या २ वर्षाच्या चिमुरड्याचा राहत्या घराच्या बाल्कांनीवरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गौरव देवरे असे या चिमुरड्याचे नाव आहे. संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गौरव घरात क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळतांना घराच्या बाल्कनीतून अचानक गौरवचा तोल गेला आणि तो दुसऱ्या  मजल्यावरून खाली पडला. पोटाला आणि छातीला जबर मार लागल्याने त्याला तात्काळ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला.